
सोलापूर ः स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ तेलंगणाच्या पाच किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत येथील स्वामी विवेकानंद प्रशालेची श्रद्धा गुंटूक हिने दुसरा क्रमांक संपादन केला.
हैदराबाद डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशन व उस्मानिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा अवेअरनेस ऑन स्पोर्ट्सवर आधारित या इंटरनॅशनल स्पर्धेत येथील धावपटू श्रद्धाने खुल्या गटात ही कामगिरी केली. या स्पर्धेत १५०० स्पर्धक सहभागी झाले होते.
ही स्पर्धा हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटी येथील सिंथेटीक ट्रॅकवर झाली. नॅशनल ॲथलेटिक्स फाऊंडेशन हैदराबादच्या वतीने श्रद्धाला मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम रुपये २१ हजार देऊन गौरविण्यात आले. श्रद्धाला सीनियर ऑलिम्पियन केशवराज सिंह व स्वामी विवेकानंद प्रशालेचे क्रीडा प्रशिक्षक कृष्णा कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे, प्राचार्य चिदानंद माळी व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केलेे.