
सातारा ः सातारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती श्री शाहू क्रीडा संकुल आणि एके ग्रुप अँड ग्रिफिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मुली व महिलांसाठी जलतरण स्पर्धा घेण्यात आली.
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर व एके ग्रुप अँड ग्रिफिन्सचे संस्थापक अंकुश कपाडिया व अजय कपाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मुली व महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.
या प्रसंगी शिवानी कळसकर, रेणू येळगावकर, मेघा नलावडे, सुनील जाधव, देवकर, संस्कृती मोरे, नीलिमा मोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जलतरण तलावाच्या व्यवस्थापक नीलम राहुल पवार यांनी केले.