
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ, श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो हॉल बजाजनगर एमआयडीसी वाळूज येथे मोफत मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.
बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १५० मुली व महिलांनी सहभाग नोंदवला. मुख्य प्रशिक्षक भिमराज रहाणे, अशोक जंगमे, ऋतुजा सौदागर, सुप्रिया जंगमे, तृप्ती जंगमे यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. ग्रामपंचायत सदस्य उषाताई हांडे व नंदाताई भोकरे यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.