
अर्पिता सरोदे कर्णधार, गौरी चंद्रे उपकर्णधार
छत्रपती संभाजीनगर : राज्यस्तरीय अस्मिता ज्युनिअर महिला हॉकी लीग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आलेला आहे.
पुणे येथील पिंपरी चिंचवड मधील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धा ९ ते १४ मार्च दरम्यान हॉकी महाराष्ट्रच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीने आयोजित निवड चाचणीतून या स्पर्धेसाठी महिला संघाची निवड करण्यात आली आहे.
संघ निवड समिती सदस्य म्हणून श्यामसुंदर भालेराव, इम्रान शेख, संजय तोटावाड, समीर शेख यांच्या काम पहिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संघात अर्पिता सरोदे (कर्णधार), गौरी चंद्रे (उपकर्णधार), अर्चिता सूर्यवंशी, गुंजन बाविस्कर, प्रगती भांडेकर, वैष्णवी पंधरे, प्राची कटरे, प्राची पाणचोरे, पूर्वा दुपारे, प्रेरणा येरोंडोल, किशोरी काटोळे, गायत्री पुरी, लावण्या बावणे, प्रीती पेहेरकर, गौरी जाधव, दिव्या घोडके, श्रद्धा ढाकणे, पुजा साळुंके या खेळाडूंचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून विशाखा शिंदे यांची तर प्रशिक्षक म्हणून किशन चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष अशोक सायन्ना यादव, दिनेश गंगवाल, शेख साजिद, डॅनियल फर्नांडिस, आझम सय्यद, संजय चंद्रशेखर यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.