
सामनावीर रुशिता जंजाळची प्रभावी गोलंदाजी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत जालना महिला संघाने सीडीए महिला संघावर सहा विकेट राखून विजय संपादन केला. या सामन्यात जालना संघाची रुशिता जंजाळ हिने सामनावीर किताब पटकावला.
पीकेएस विस्डम क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. सीडीए महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ३३ षटकात सर्वबाद १०० असे माफक लक्ष्य उभे केले. जालना महिला संघाने २२.१ षटकात चार बाद १०१ धावा फटकावत सहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला.
या सामन्यात प्रणवी बनसोडे हिने ७७ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. तिने आठ चौकार मारले. आरुषी गलांडे हिने ३६ चेंडूत २५ धावा काढल्या. तिने पाच चौकार मारले. कार्तिकी देशमुख हिने चार चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत रुशिता जंजाळ हिने अवघ्या १४ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वेदिका थोरात हिने १६ धावांत तीन बळी टिपले. मीना गुरवे हिने ४० धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः सीडीए महिला संघ ः ३३ षटकात सर्वबाद १०० (प्रणवी बनसोडे ४७, सिमरन भाटिया ६, तेजस्विनी मोरे ९, आर्य वर्मा नाबाद ६, इतर २२, रुशिता जंजाळ ४-१४, मीना गुरवे २-४०, मानिनी वायाळ १-१६, सिद्धी लोणकर १-५, जावेरिया कुरेशी १-९, साक्षी सिरसाठ १-३) पराभूत विरुद्ध जालना महिला संघ ः २२.१ षटकात चार बाद १०१ (आरुषी गलांडे २५, ईशानी वर्मा १४, रुशिता जंजाळ १२, मीना गुरवे ९, कार्तिकी देशमुख नाबाद २१, मानिनी वायाळ नाबाद १, इतर १९, वेदिका थोरात ३-१६, आर्य वर्मा १-२६). सामनावीर ः रुशिता जंजाळ.