
भूमिका चव्हाण, दिव्या जाधव, श्वेता माने, माधुरी आघावची लक्षवेधक कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महिला संघाने रिक्रिएशन महिला संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. भूमिका चव्हाण हिने सामनावीर किताब पटकावला.
कोळवाडी येथील मास्टर्स क्रिकेट क्लब मैदानावर हा सामना झाला. रिक्रिएशन महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांना हा निर्णय महागात पडला. छत्रपती संभाजीनगर संघाने त्यांना ३३.५ षटकात ८७ धावांवर रोखून सामन्यावर वर्चस्व मिळवले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महिला संघाने अवघ्या १३.४ षटकात चार बाद ८८ धावा फटकवात सहा विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात संजना शिंदे हिने ६० चेंडूत ३६ धावा काढल्या. तिने चार चौकार मारले. श्वेता माने हिने २३ चेंडूत २६ धावांची आक्रमक खेळी केली. तिने तीन चौकार मारले. माधुरी आघाव हिने २३ चेंडूत २५ धावांची वेगवान खेळी केली. तिने पाच चौकार मारले. गोलंदाजीत भूमिका चव्हाण हिने १६ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दिव्या जाधव हिने २१ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. सिमरन डबास हिने ४१ धावांत तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः रिक्रिएशन महिला संघ ः ३३.५ षटकात सर्वबाद ८७ (सिमरन डबास २१, आराध्या चौधरी १५, संजना शिंदे नाबाद ३६, भूमिका चव्हाण ४-१६, दिव्या जाधव ४-२१, अक्षरा डांगे १-८, मुक्ता मगरे १-२०) पराभूत विरुद्ध छत्रपती संभाजीनगर महिला संघ ः १३.४ षटकात चार बाद ८८ (जिया सिंग १७, माधुरी आघाव २५, श्वेता माने नाबाद २६, मुक्ता मगरे ८, भूमिका चव्हाण ८, यशोदा घोगरे नाबाद १, सिमरन डबास ३-४१, शर्वरी जोशी १-२). सामनावीर ः भूमिका चव्हाण.