
नागपूर ः राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत नागपूरच्या डॉ अशोक कप्ता यांनी तीन सुवर्णपदक आणि एक रौप्य अशी चार पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली.
प्रसिद्ध राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक, संचालक आणि कप्ताज् अकादमीचे प्रशिक्षक डॉ अशोक कप्ता यांनी ओडिशातील बिज्जू पटनाईक स्टेडियम राउरकेला येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय मास्टर गेम्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
डॉ अशोक कप्ता यांनी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी तीन सुवर्ण व एक रौप्य अशी चार पदके जिंकली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ अशोक कप्ता यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.