
नागपूर ः खजुराहो मॅरेथॉन स्पर्धेत नागपूरच्या आर्या टाकोने याने विजेतेपद पटकावले तर योगेश जैस्वाल याने तृतीय क्रमांक संपादन केला.
मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या सहकार्याने अॅडव्हेंचर्स अँड यू द्वारे खजुराहो मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष होते. खुजराहो मॅरेथॉन स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ५ किलोमीटर अशा तीन प्रकारात घेण्यात आली. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचे संयुक्त संचालक एस के श्रीवास्तव, सहाय्यक संचालक के के सिंग यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे स्पर्धा संचालक म्हणून मितेश रांभिया यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल
२१ किलोमीटर पुरुष गट ः १. लखन हंसदाह (पन्ना), २. सचिन हंसदाह (पन्ना), ३. योगेश जैस्वाल (नागपूर). महिला गट ः १. आशा सिंग (लखनौ).
१० किलोमीटर पुरुष गट ः १. सुरेंदर मलिक (दिल्ली), २. अतुलसिंग हाडा (जळगाव), ३. संजय हंसदाह (पन्ना). महिला गट ः १. मनजोत कौर (मुंबई), २. श्वेता खरे (सागर), ३. डॉ वीणा मलिक (इंदूर).
५ किलोमीटर महिला गट ः १. आर्या टाकोने, २. खुशी प्रजापती (खजुराहो), ३. महक बानो (खजुराहो). पुरुष गट ः १. आशिष धाकर (खजुराहो), २. गौरव कुशवाह (खजुराहो), ३. चंद्रशेखर (खजुराहो).