सोलापूर जिल्हा महिला खो-खो संघाचे सराव शिबीर सुरू

  • By admin
  • March 11, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

सोलापूर ः शेवगाव (अहिल्यानगर) येथे १३ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी जिल्हा खो-खो संघाचे सराव शिबिर जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालय येथे सुरू झाले.

किरण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सुरू असलेल्या या सराव शिबिराचे उद्घाटन निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू सत्येन जाधव यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सोलापूर खो-खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे आदी उपस्थित होते. या शिबिरास किरण स्पोर्ट्स क्लबचे सचिव मोहन रजपूत हे मार्गदर्शन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *