
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेतर्फे १६ मार्च रोजी जिल्हास्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलिबॉल संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलिबॉल स्पर्धा राजीव गांधी स्टेडियम बेलापूर येथे २१ ते २३ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येत आहे. १६ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल सिडको एन ६ या ठिकाणी सकाळी दहा वाजता निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या निवड चाचणीतून निवडण्यात आलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघाला विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घ्यावा लागेल. विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धा यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदानावर होणार आहे.
राज्य स्तरावर होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला स्पर्धेसाठी विभागातून पुरुषाचे प्रथम व द्वितीय संघ तसेच महिलांचा विजय संघ पाठवण्यात येईल. या विभागीय स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ भाग घेणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुरुष व महिला खेळाडूंनी जिल्हास्तरीय संघाच्या निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन विभागीय व्हॉलिबॉल सचिव सतीश पाठक, सय्यद रफत, उमेश शिंदे, अर्षद काजी, नवेद पठाण, प्रवीण शिंदे, लुकमन बागवान, अभिजित दीख्खत, अक्रम काजी, रोहित पाटील, नारायण शिंदे, सोमनाथ पचलूरे, सोमनाथ टाक, ज्योती दांडगे, प्रफुल्ल कुलकर्णी, विलास राजपूत, गणपत पवार, आशिष शुक्ला, जब्बार पठाण व आसिफ पठाण यांनी केले आहे