
छत्रपती संभाजीनगर ः फिट इंडिया वुमन्स विक अंतर्गत आयोजित योगासन स्पर्धेत आचल राठोड, वेदाली धोत्रे, शौर्या जांभळे, वैभवी काडवदे, कल्याणी बुरसुले, राणी विसपुते, विद्या ताकसांडे, रत्नमाला भुसावळकर यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद मिळवले.
विभागीय क्रीडा संकुल येथे फिट इंडिया वुमन्स विक अंतर्गत महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन व छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगासन स्पर्धेत १४८ महिला व योग सत्रात १५९ महिलांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय क्रीडा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगरचे सहायक संचालक सुमेध तरोडेकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी भारतीय योग संस्थानचे उपप्रांत अधिकारी डॉ उत्तम काळवणे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बक्षिस वितरण भारतीय क्रीडा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगरचे सहायक संचालक सुमेध तरोडेकर, क्रीडा अधिकारी रामकिशन केशव मायंदे, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, भारतीय योग संस्थान नवी दिल्लीचे उपप्रांत अधिकारी डॉ उत्तम काळवणे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत पंच म्हणून छाया मिरकर, छाया सोमवंशी, पूजा सदावर्ते, वैजीनाथ डोमाळे. वर्षा देशपांडे, दिनेश देशपांडे, कोमल सुरडकर, दीपाली शर्मा यांनी काम पाहिले.
योगासन स्पर्धेचा अंतिम निकाल
वयोगट अंडर १० ः १. आचल राठोड, २. तेजू पूरबगोल, ३. आकांक्षा शेजुळ, ४. तेजस्विनी पेंडणे, ५. आरोही गोसावी.
वयोगट १० ते १४ ः १. वेदाली धोत्रे, २. स्वस्तिका भालेराव, ३. ऋतवी वाटोरे, ४. सुधनैनी गोंडा, ५. श्रावणी पाटील.
वयोगट १४ ते १८ ः १. शैार्या जांभळे, २. आर्या जांभळे, ३. वैष्णवी शर्मा, ४. स्नेहल मुंडे, ५. अपेक्षा अवचरमल.
वयोगट १८ ते २८ ः १. वैभवी काडवादे, २. पूजा घुगे, ३. मेघना आव्हाड, ४. मरियम खान, ५. नेहा जोंधळे.
वयोगट २८ ते ३५ ः १. कल्याणी फुरसुले, २. कोमल सुरडकर, ३. नागमणी पांचाळ.
वयोगट ३५ ते ४५ ः १. राणी विसपुते, २. रीना पाटील, ३. मीनाक्षी हजारे, ४. वर्षा शिंदे, ५. गायत्री पारसेवार.
वयोगट ४५ ते ५५ ः १. विद्या ताकसांडे, २. संगीता पाटील, ३. अनिता हरकळ, ४. इंदुमती घोडके, ५. कालिंदी चव्हाण.
वयोगट ५५ वर्षांवरील महिला ः १. रत्नमाला भुसावळकर, २. संध्या राठोड, ३. जयमाला वाघमारे, ४. किरण पाटील, ५. अश्विनी अंकुश.