
सिंधुदुर्ग ः कणकवली कलमठ येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मॅरेथॉन स्पर्धेत अनन्या कुंभार, आकांक्षा कुंभार, सेहा तेरसे, कुंदन परब यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
श्री फौंडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम जि. सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने कलमठ ग्रामपंचायतच्या (ता. कणकवली) सहकार्याने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कलमठ जिल्हास्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धा बिडयेवाडी कलमठ येथे घेण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन शिरगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर राऊत, स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण कदम, रवींद्र यादव, तेज स्पोर्ट्स क्लबच्या मार्गदशक तेजस्वी नाईक, प्रदीप चव्हाण, गौरव राणे, रुपेश वाळके, उदय यादव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयी झालेल्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ मंदिरात झाला. कलमठ ग्रामपंचायत सदस्य रवींद्र यादव, समीर राऊत, बाळकृष्ण कदम, तेजस्वी नाईक, चंद्रकांत पवार, मुळीक, सुवर्णा जोशी, अंजली गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच गुणवंत महिला खेळाडू अनुसया चिंदरकरचा सन्मान क्रीडा संस्थेच्या वतीने करण्यात आला.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१० वर्षांखालील मुली ः १. अनन्या कुंभार, २. सिद्धी चव्हाण, ३. रिया गोधोळकर, ४. औरा जॉन्शन डी सुझाव.
१४ वर्षांखालील मुली ः १. आकांक्षा कुंभार, २. महिमा मोहिते, ३. स्वरा गावडे, ४. स्वरा पालव, ५. आस्था लिगयात.
१८ वर्षांखालील मुली ः १. सेहा तेरसे, २. संध्या गोधोळकर.
४५ वर्षांवरील महिला खुला गट ः १. कुंदन परब.