
मुंबई ः दिल्ली येथे होणाऱया राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला कॅरम संघ जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार यांनी महाराष्ट्राचा पुरुष व महिला कॅरम संघ जाहीर केला. महाराष्ट्राचा महिला व पुरुष कॅरम संघ दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे १७ ते २१ मार्च या कालावधीत होणाऱया ५२व्या राष्ट्रीय कॅऱम स्पर्धेत सहभागी होणार आहे.
गेल्या वर्षभरातील कामगिरीवरुन महाराष्ट्राचा पुरुष व महिला कॅऱम संघ निवडण्यात आला आहे. या दोन्ही संघाचे सराव शिबीर १२ ते १४ मार्च या कालावधीत एमसीए ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी महाराष्ट्राचा संघ दिल्लीला रवाना होणार आहे. महाराष्ट्र कॅऱम संघटनेच्यावतीने पुरुष व महिला संघाला वातानुकूलित प्रवास व्यवस्था, दैनंदिन भत्ता व गणवेश देण्यात आला आहे अशी माहिती मानद सचिव अरुण केदार यांनी दिली.
महाराष्ट्र संघ
पुरुष संघ ः विकास धारिया, संजय मांडे, फहिम काझी (सर्व मुंबई), सागर वाघमारे (पुणे), पंकज पवार (ठाणे), रिझवान शेख (मुंबई उपनगर). संघ व्यवस्थापक ः संजय देसाई.
महिला संघ ः मधुरा देवळे, चैताली सुवारी (ठाणे), केशर निर्गुण, दीक्षा चव्हाण (सिंधुदुर्ग), रिंकी कुमारी, सिमरन शिंदे (मुंबई). संघ व्यवस्थापक ः प्राची जोशी.