
जागतिक महिला दिना निमित्त आयोजन, ११८ खेळाडूंचा सहभाग
दोंडाईचा ः हस्ती पब्लिक स्कूल क्रीडा संकुल दोंडाईचा येथे हस्ती शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त भव्य बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईचा पाणी पुरवढा विभागाच्या माजी सभापती वैशाली महाजन या होत्या. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून वैद्यकीय अधिकारी युतिका भामरे या उपस्थित होत्या. दीप प्रज्वलन स्मितल गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी हस्ती स्कूल समन्वयक नियंत्रक सकिना भारमल, आर्किटेक्ट जयश्री सोमवंशी, ॲड आशा मन्सुरी, पोलीस कॉन्स्टेबल सुरेखा काळे, हस्ती स्कूल प्राचार्य राजेंद्र त्रिभुवन, क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे, जळगाव शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव निलेश बाविस्कर, हॉकी संघटनेचे सचिव प्रशिक्षक दुर्गेश पवार, तलवारबाजी प्रशिक्षक विशाल पवार, शारीरिक शिक्षण शिक्षक योगेश पाटील, प्रा भरत कोळी, बॉक्सिंग प्राशिक्षक पवन शिरसाठ, सर्व पंच, प्रशिक्षक व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रीय खेळाडू माहेश्वरी चोपडेचा सन्मान करण्यात आला.
विजेत्या बॉक्सिंग खेळाडूंना बक्षीस वितरण नंदुरबार जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ मयूर ठाकरे, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे, जळगाव शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव निलेश बाविस्कर, क्रीडा विभाग प्रमुख जितेंद्र सुरवाडे, प्रकाश खंडेराव, विशाल पवार सर्व बॉक्सिंग प्रशिक्षक पंच यांच्या हस्ते करण्यात आले.
धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, उपाध्यक्ष कैलास जैन, सहसचिव लिंबाजी प्रताळे, खजिनदार जितेंद्र बोरसे, किशोर पाटील, योगेश पाटील यांनी विजेत्या महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
जागतिक महिला दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धेत हस्ती बॉक्सिंग क्लब दोंडाईचा, केव्हीपीएस बॉक्सिंग क्लब शिरपूर, क्ले बॉक्सिंग क्लब भुसावळ, ब्लू स्टार बॉक्सिंग क्लब भुसावळ, एनबीएफएस क्लब जळगाव शहर, आबाजी स्पोर्ट्स नंदुरबार, धुळे बॉक्सिंग क्लब, छत्रपती बॉक्सिंग क्लब धुळे शहर यांनी सहभाग नोंदवत एकूण ११८ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत पंच म्हणून भरत कोळी, ऋषिकेश अहिरे, योगेश माळी, भूषण पवार, पुनम उठवाल, अलिशा शेख, सुरज शिरसाठ, दीपक गिरासे, दर्शन कोळी, नयन सोनवणे, रोहित सोनवणे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन भरत कोळी यांनी केले. विशाल पवार यांनी आभार मानले.
बॉक्सिंग स्पर्धेसाठी हस्ती स्कूलचे क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे, प्रकाश खंडेराव, विशाल पवार, बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव, निलेश धनगर, रोशनी पाटील, तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अहिरे, ओम राजपूत, कामिनी पाटील, धनिकलाला ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले.