
नागपूर ः आरटीएम नागपूर विद्यापीठाचा बॉल बॅडमिंटन पुरुष संघ जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाचा हा संघ तामाका, कोलार येथे आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. बंगळुरू उत्तर विद्यापीठ, कर्नाटक यांनी १४ ते १७ मार्च या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विद्यापीठ बॉल बॅडमिंटन संघात साहिल चुटे (बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा), निशांत यादव (बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा), गौरव पालीवाल (नबिरा कॉलेज काटोल), मयूर तांबूसकर (नबिरा कॉलेज काटोल), अभिनव राऊत (जी. एस. कॉमर्स कॉलेज, नागपूर), शुभम खरवडे (जे. एम. पटेल कॉलेज भंडारा), राजीव मेश्राम (झुलेलाल कॉलेज ऑफ इंजिनीअर अँड टेक. नागपूर), प्रज्वल ठाकरे (नागपूर शारिरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर), मनोज वारंभे (संत गाडगे महाराज महा. हिंगणा), जयकुमार शाहू (डॉ. एम. डब्ल्यू. पी. डब्ल्यू. एस. कॉलेज नागपूर) या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी विनय पडोलिया आणि संघ व्यवस्थापक म्हणून शशांक राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ विशाखा जोशी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.