
जालना ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साई मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये सर्व विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणासाठी एकदिवसीय तायक्वांदो प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू व राष्ट्रीय पंच आणि एनआयएस प्रशिक्षक मयूर पिवळ यांनी विद्यार्थ्यांना तायक्वांदो खेळाबद्दल माहिती देऊन स्वसंरक्षण कौशल्य संबंधित मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मयूर पिवळ यांनी छेड काढणाऱ्यांचा कसा सामना करायचा, एखाद्या व्यक्तीने हल्ला केल्यावर स्वत:चे संरक्षण कसे करायचे, याबद्दल विद्यार्थिनींना तायक्वांदोची प्रात्यक्षिक करून दाखवले.
सध्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना बघता सर्व विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी शाळेच्या अध्यक्षा सुनीता बळीराम गिते यांनी ही संकल्पना पुढे केली. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा जाधव यांनी महीला सक्षमीकरणबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल जाधव यांनी केले. उपमुख्याध्यापिका अफरिन शेख यांनी आभार मानले.