
रेखा शिंदेने महिलांच्या स्पर्धेत मारली बाजी
मुंबई ः परब फिटनेसच्या निलेश रेमजे याच्या आठ वर्षांच्या मेहनतीला फळ मिळवले आणि मुंबई श्री किताबाच्या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा अंधेरीतील लोखंडवाला गार्डनमध्ये झाली आणि त्यात निलेशने शानदार कौशल्य सादर केले. निलेशने गणेश उपाध्याय, संजय प्रजापती आणि अभिषेक माशेलकर यांसारख्या तगड्या खेळाडूंवर मात करत मुंबई श्री किताब पटकावला.
वर्षानुवर्षे स्पर्धेतील आपले प्रयत्न अपयशी ठरले तरी निलेशने हार मानली नाही आणि त्याच्या अथक परिश्रमामुळे मुंबई श्री किताबासारख्या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. निलेश याने आठ वर्षांच्या शरीरसौष्ठव कारकीर्दीत पहिलेच जेतेपद जिंकले आहे. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिट जिमच्या रेखा शिंदे हिने अपेक्षेप्रमाणे सर्व स्पर्धकांना मागे टाकले आणि ‘मिस मुंबई’ हा मानाचा किताब पटकावला.

स्पर्धेची आयोजन समिती, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटना यांनी चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचा समावेश होता. माजी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार हारुन खान, मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि सरचिटणीस राजेश सावंत यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळे वलय प्राप्त झाले होते.
मुंबई श्री स्पर्धेचा अंतिम निकाल
५५ किलो वजनी गट : १. राजेश तारवे (शाहु जिम), २. अक्षय गवाणे (पॉवर फिटनेस), ३. अर्जुन बांदिवडेकर (बॉडी वर्कशॉप), ४. रंजित बंगेरा (आदिअंश जिम), ५. सिध्दांत लाड (परब फिटनेस).
६० किलो : १. सुयश सावंत (शिवशक्ती जिम), २. मनोहर पाटील (परब फिटनेस), ३. संजय जाधव (आर एम भट जिम), ४. गीतेश मोरे (समर्थ जिम),५. ईश्वर ढोलम (परब फिटनेस).
६५ किलो : १. गणेश पारकर (परब फिटनेस), २. नदिम शेख (सावरकर जिम), ३. देव विश्वास (लाईफ फिटनेस), ४. हसीफुल शेख (परब फिटनेस), ५. स्टिफन रजा (परब फिटनेस).
७० किलो : १. विशाल धावडे (बालमित्र व्यायामशाळा), २. संदीप सावळे (परब फिटनेस), ३. दीपेश पवार (जय भवानी व्यायामशाळा), ४. हितेन तामोरे (स्ट्रेंथ जिम), ५. मनीष वाघेला (आर्यन फिटनेस).
७५ किलो : १. गणेश उपाध्याय (परब फिटनेस), २. भगवान बोर्हाडे (परब फिटनेस), ३. विश्वंभर राऊळ (मॉंसाहेब जिम), ४. अमोल जाधव (बॉडी वर्कशॉप), ५. मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉप).
८० किलो : १. संजय प्रजापती (बॉडी पंप जिम), २. सौरभ म्हात्रे (आय क्यु फिटनेस) , ३. ओमकार कलके (फिटनेस पॉईट), ४. कुणाल मंडाल (स्ट्रेंथ जिम), ५. रेवांश मनिडा (मॉंसाहेब जिम).
८५ किलो : १. अभिषेक माशेलकर ( बॉडी फिटनेस), २. आयुष तांडेल (परब फिटनेस), ३. सुलतान पठाण (द फ्लेक्स), ४. रोहन कांदळगांवकर (परब फिटनेस), ५. अमनकुमार मिश्रा (जय भवानी व्यायाम शाळा).
८५ किलोवरील: १. निलेश रेमजे (परब फिटनेस), २. अरुण नेवरेकर (हर्क्युलस फिटनेस), ३. अभिषेक लोंढे (हर्क्युलस फिटनेस).
मुंबई श्री विजेता : निलेश रेमजे (परब फिटनेस), उपविजेता : गणेश उपाध्याय (परब फिटनेस).
मेन्स फिटनेस (१७० सेमीपर्यंत) : १. मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉप), २. आकाश जाधव (बॉडी वर्कशॉप), ३. साहिल सावंत (मॉंसाहेब जिम),४. देव विश्वास (लाईफ फिटनेस), ५. अर्जुन बांदिवडेकर (बॉडी वर्कशॉप).
मेन्स फिटनेस (१७० सेमीवरील) : १. निलेश गुरव (मॉंसाहेब जिम), २. विश्वंभर राऊळ (मॉंसाहेब जिम), ३. अमर पटेल (हर्क्युलस फिटनेस), ४. रॉजर टाऊरो (बॉडी वर्कशॉप), ५. करण बावरे (स्ट्रेंथ जिम)
महिला शरीरसौष्ठव : १. रेखा शिंदे ( बॉडी फिट जिम), २. ममता येझरकर (फोकस फिटनेस), ३. किमया बेर्डे (प्लेस फिटनेस), ४. लवीना नरोना (अॅक्टीव फिटनेस), ५. राजश्री मोहिते (केन्झो फिटनेस).
मिस मुंबई : रेखा शिंदे (बॉडी फिट जिम),