
पुणे ः एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दरवर्षी जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धा घेण्यात येतात. या वर्षीची कॅरम स्पर्धा २० ते २३ मार्च या कालावधीमध्ये एरंडवणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ६० वर्षांवरील सर्व महिला व पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक सहभाग घेऊ शकतील. प्रथम क्रमांक विजेत्यास तीन हजार रुपये आणि जी पी सहस्रबुद्धे चषक, द्वितीय क्रमांक विजेत्यास दोन हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्यास रुपये एक हजार रुपये आणि क्रमांक पाच ते आठ खेळाडूंना रुपये पाचशे प्रत्येकी अशी पारितोषिके देण्यात येतील.
अधिक माहिती व स्पर्धेत नाव नोंदणीसाठी कॅरम स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी (9822843106), पंकज कुलकर्णी (9011072950), सतीश सहस्रबुद्धे (9028332736) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अजित गोखले यांनी केले आहे.