
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कर्णधारपदी अनिकेत मालोदे व वैष्णवी पाठसावाने
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने सन २०२४-२५ सालची ६० वी पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा शेवगाव येथे गुरुवारपासून (१३ मार्च) सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महिला व पुरुष संघ जाहीर करण्यात आला आहे. अनिकेत मालोदे व वैष्णवी पाठसावाने यांची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
शेवगाव स्पोर्टस् बहुउद्देशीय फाऊंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव व अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज शेवगाव वतीने १३ ते १६ मार्च या कालावधीत शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे ही राज्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
६० वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर पुरुष संघाच्या कर्णधारपदी अनिकेत मालोदे तसेच महिला संघाच्या कर्णधारपदी वैष्णवी पाठसावाने यांची निवड करण्यात आली आहे.
नागनाथ अर्बन बँकेतर्फे गणवेश
नागनाथ अर्बन बँकेचे अध्यक्ष रत्नाकर म्हस्के यांनी पुरुष व महिला संघास गणवेश दिला आहे. या संघास छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन कराड, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार गोविंद शर्मा, मध्य विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ साळवे, सौरभ यादव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन कार्याध्यक्ष बालाजी सागर किल्लारीकर, उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, विनायक राऊत, आशिष कान्हेड, मनोज गायकवाड, उमेश साबळे, शुभम सुरळे, राहुल नाईकनवरे, यशराज सौदे, उदय मुळे, संदिप साळवे, मोहन अहिरे, शेखर जाधव, ओंकार देशपांडे, स्वराज दहिवाल यांनी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर संघ
पुरुष संघ ः अनिकेत मालोदे (कर्णधार, शिवाजी महाविद्यालय), भीम सोनटक्के (देवगिरी महाविद्यालय), अभिषेक गावीत, अतुल गावीत, सुशांत गावीत (राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा), कृष्णा पंडूरे, साई लोखंडे, धनेश देवकाते (सरस्वती भुवन प्रशाला), यश पाखरे, तातेराव म्हस्के (सरस्वती भुवन महाविद्यालय), सुमेध शेजवळ, सार्थक थटेकर (धर्मवीर संभाजी विद्यालय), मनोज काकडे, आदित्य दौंगे (जिजाई महाविद्यालय), अजय शेळके (प्रतिष्ठान महाविद्यालय). प्रशिक्षक ः गौतम निसर्गंध, व्यवस्थापक ः योगेश तांबे.
महिला संघ : वैष्णवी पाठसावाने (कर्णधार), दिशा इंगळे, आकांक्षा क्षीरसागर, वैष्णवी भावले, ऋतुजा पाडसावान (सर्व आ.कृ.वाघमारे प्रशाला), आकांक्षा हरकळ (वरद महाविद्यालय), आनंदी बल्लाळ, गौरी झुंजारकर, जान्हवी पवार, श्रद्धा काळे, राजनंदिनी पाथ्रीकर, मधुरा पवार, ओजस्वी शिंदे, राजनंदिनी वलकरी, इशिका थोरात (सर्व आ. कृ. वाघमारे प्रशाला). प्रशिक्षक ः श्रीपाद लोहकरे, व्यवस्थापक ः कल्याणी सोनावणे.