
लाईफलाईन-मस्सिया औद्योगिक क्रिकेट ः रामेश्वर मतसागर, मयंक विजयवर्गीय चमकले
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन- मस्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत कॉस्मो फिल्म्स संघाने एआयटीजी संघाचा तीन विकेट राखून पराभव केला. या सामन्यात रामेश्वर मतसागर याने सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. कॉस्मो फिल्म्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत एआयटीजी संघाला २० षटकात नऊ बाद १२१ धावांवर रोखले. कॉस्मो फिल्म्स संघाने या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना १७.५ षटकात सात बाद १२३ धावा फटकावत तीन गडी राखून सामना जिंकला.

कमी धावसंख्येच्या या सामन्यात जेके याने २९ चेंडूत ३४ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व दोन चौकार मारले. रामेश्वर मतसागर याने ३० चेंडूत ३४ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. सतीश भुजंगे याने १२ चेंडूत २१ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने एक षटकार व दोन चौकार ठोकले. गोलंदाजीत रामेश्वर मतसागर याने २६ धावांत चार विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर किताब प्रदान करण्यात आला. मयंक विजयवर्गीय याने २६ धावांत तीन विकेट घेतल्या. जेके याने १७ धावांत दोन बळी घेऊन अष्टपैलू ठसा उमटवला.
संक्षिप्त धावफलक ः एआयटीजी ः २० षटकात नऊ बाद १२१ (कुणाल जांगडे १९, मिहिर सौंदलगेकर ७, उमर काझी २०, जेके ३४, नितेश विंचुरकर ६, इतर २०, रामेश्वर मतसागर ४-२६, सतीश भुजंगे २-२३, विराज चितळे १-१६, बीजे १-१५) पराभूत विरुद्ध कॉस्मो फिल्म्स ः १७.५ षटकात सात बाद १२३ (सतीश भुजंगे २१, अभिषेक चव्हाण २०, विराज चितळे १०, रामेश्वर मतसागर नाबाद ३४, अमोल नागरे १०, संभाजी साबळे ६, इतर १२, मयंक विजयवर्गीय ३-२६, रुशी बिरुटे २-३२, जेके २-१७). सामनावीर ः रामेश्वर मतसागर.