
जुबेर शेख, सादिया मुल्ला यांची कर्णधारपदी निवड
सोलापूर ः सोलापूर जिल्हा खो-खो संघाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या जुबेर शेख आणि किरण स्पोर्ट्स क्लबच्या सादिया मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे. शेवगाव (अहिल्यानगर) येथे १३ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्यासाठी सोलापूर जिल्हा संघ रवाना झाला आहे.
सोलापूर जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून निवड समिती सदस्य धोंडीराम पाटील (सांगोला), विजय दत्तू (मंगळवेढा) व उमाकांत गायकवाड (सोलापूर) यांनी निवडलेला संघ सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस ए बी संगवे यांनी जाहीर केला. या संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पुरुष संघाचे सराव शिबिर उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने एच डी प्रशालेच्या मैदानावर व महिला संघाचे सराव शिबिर किरण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. या शिबिराचा समारोप एच डी प्रशालेचे पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांच्या हस्ते झाला. यावेळी निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा संघटनेचे सरचिटणीस ए बी संगवे, सहसचिव राजाराम शितोळे, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सचिव अजित शिंदे, खजिनदार उमाकांत गायकवाड, किरण स्पोर्ट्सचे सचिव मोहन रजपूत, संघ व्यवस्थापक वैभव लिगाडे आदी उपस्थित होते.
सोलापूर खो-खो संघ
पुरुष संघ ः जुबेर शेख (कर्णधार), विजय संकटे, जाफर शेख (उत्कर्ष मंडळ), अक्षय इंगळे, सौरभ चव्हाण, राकेश राठोड, समर्थ कोळी, रोहन रजपूत (किरण स्पोर्ट्स), अजित रणदिवे, गणेश बोरकर, अजय कश्यप, कृष्णा बनसोडे (अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), तुषार चव्हाण (फ्लाईंग स्पोर्ट्स पंढरपूर), आकाश हजारे, अमोल केदार (शिवप्रतिष्ठान मंगळवेढा). प्रशिक्षक ः आशिष औदुर्ती, संघ व्यवस्थापक ः वैभव लिगाडे.
महिला संघ ः सादिया मुल्ला (कर्णधार), सृष्टी रुपनवर, गौरी कासवीद, सपना बंडे, साक्षी व्हनमाने, अर्चना व्हनमाने, आरती खरात, सृष्टी नारायणी (किरण स्पोर्ट्स), स्नेहा लामकाने, समृद्धी सुरवसे, साक्षी देठे, श्रुती कस्तुरे (के. के. स्पोर्ट्स, वाडीकुरोली), विशाखा लोखंडे (साकत प्रशाला, बार्शी), अक्षता परचंडे (समृद्धी स्पोर्टस्), सृष्टी काळे (न्यू सोलापूर), प्रशिक्षक ः मोहन रजपूत, संघ व्यवस्थापिका ः समृद्धी बगले.