
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट : अष्टपैलू आकाश बोराडे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० करंडक क्रिकेट स्पर्धेत कॅनरा बँक संघाने शानदार कामगिरी बजावत शहर पोलिस संघाचा तीन विकेट राखून पराभव केला. या सामन्यात आकाश बोराडे याने अष्टपैलू कामगिरी बजावत सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. शहर पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शहर पोलिस संघाने १९.५ षटकात सर्वबाद १३२ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना कॅनरा बँक संघाने १९.१ षटकात सात बाद १३६ धावा फटकावत तीन विकेट राखून सामना जिंकला. एकवेळ कॅनरा संघ मोठा विजय नोंदवेल असे वाटत होते. मात्र, चार फलंदाज झटपट गमावले. कठीण परिस्थितीत धीरज बहुरे याने नाबाद २७ धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची खेळी केली.
या सामन्यात आकाश बोराडे याने ३१ चेंडूत ४८ धावांची दमदार खेळी केली. आकाशने दोन षटकार व चार चौकार मारले. धीरज बहुरे याने २७ चेंडूत नाबाद २९ धावा फटकावत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. धीरजने एक षटकार व दोन चौकार मारले. ग्यानोजी गायकवाड याने एक षटकार व दोन चौकारांसह २४ चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत आर्यन शेजुळ याने २४ धावांत तीन विकेट घेत सामना रोमांचक बनवला. ग्यानोजी गायकवाड याने १५ धावांत दोन गडी बाद केले. आकाश बोराडे याने २५ धावांत दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक ः शहर पोलिस संघ ः १९.५ षटकात सर्वबाद १३२ (प्रशांत स्वामी २१, पांडुरंग गाजे २६, ओमकार मोगल २६, अरविंद शेजुळ १९, दीपक १२, राजू परचाके नाबाद ५, इतर १४, ग्यानोजी गायकवाड २-१५, राम मंदाडे २-२७, आकाश बोराडे २-२५, प्रणीत दीक्षित १-२१, सुनील भगत १-१६) पराभूत विरुद्ध कॅनरा बँक संघ ः १९.१ षटकात सात बाद १३६ (आकाश बोराडे ४८, ग्यानोजी गायकवाड २८, धीरज बहुरे नाबाद २९, प्रणीत दीक्षित १६, राम मंदाडे नाबाद ४, आर्यन शेजुळ ३-२४, पांडुरंग गाजे १-२२, दीपक १-११). सामनावीर : आकाश बोराडे.