
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो संघटनेच्या बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील ज्युदो खेळाडूंना ग्रेड बेल्टचे वितरण करण्यात आले.
बजाजनगर एमआयडीसी वाळूज पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील आणि संदीप गायकवाड व अमोल पोटे यांच्या हस्ते ज्युदो ग्रेड बेल्ट परीक्षेत पास झालेल्या खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, ऋतुजा सौदागर, सुप्रिया जंगमे, तृप्ती जंगमे आणि खेळाडूचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारचे चित्तथरारक ज्युदो चे प्रात्यक्षिक सादर केली. या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक भीमराज पाटील रहाणे व अशोक जंगमे, यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
ग्रेट बेल्ट विजेत्या खेळाडूंचे राज्य ज्युदो संघटनेचे तांत्रिक कमिटीचे सचिव दत्ता आफळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भास्कर जाधव, दीप्ती शेवतेकर, भीमाशंकर नावंदे,अमित साकला, झिया अन्सारी, विजय साठे, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, दत्तू पवार,संजय परळीकर, बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, नंदमूरी श्रीनिवास, अनिल पवार, नामदेव दौड, मनोहर देवानी, अभिजीत दळवी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, शैलेश कावळे, सागर घुगे, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सुप्रिया जंगमे, सायली राऊत, तृप्ती जंगमे, ऋतुजा पाटील यांनी अभिनंदन केले.
ग्रेड बेल्ट वितरण
ब्राऊन बेल्ट : शंभू चोपडे, संस्कार मुसळे, नील जावळे, प्रतीक मुसळे.
ब्लू बेल्ट : रिद्धी डाखुरे, श्रेया अंभोरे, सोहम पोपटकर, मयूर बनकर, अनुज माडये, ऋषिकेश घुगे.
ग्रीन बेल्ट : मृगजा गोमदे, साधना बेडगे, देवांश समिंद्रे, ऋग्वेद खलाटे, राजेश बनसोडे, केतन पराते, अथर्व सोळंके.
ऑरेंज बेल्ट : सांची सोनवणे, सौंदर्या सोनवणे, त्रिवेणी काळे, अनुष्का भोसले, अपूर्वा म्हसे, निशा वाघ, अंशिका यादव, चेतन समिंद्रे, श्रीनिवास काळे, यश विधाटे, देव काळे, समर्थ घुगे, सुवर्ण दातरंगे, अथर्व कुलकर्णी.
येलो बेल्ट : गौरी सुरवसे, इंद्रायणी वाघमारे, आरोही जाधव, संस्कृती चौधरी, तेजस्विनी गायकवाड, चिन्मयनी निगुट, आरोही राठोड, लावण्या गायकवाड, आराध्या जाधव, ज्ञानेश्वरी जाधव, राजश्री चिकणे, धनश्री चिकणे, धनश्री पवार, मानवी कावळे, सोहम कंधारकर, विशाल मुंडे, अवधूत शिंदे, वेदांत वाघ, प्रथमेश पवार, सार्थक इंगळे, ईशान मैद, वेद पाल, जय मुसळे, साई कदम, विराज पवार, श्रेयश डुकरे, सोहम बडे, सुयोग बडे, यश क्षीरसागर, आर्यन खुटे, यश कऱ्हाळे, आर्य पाटील, अर्णव वाघमारे, राघव तांबट, आयुष्य वीर, राम कावळे.