
सोलापूर ः राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत आरोही स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत आरोही श्रीकांत पुजारी हिने २४ वर्षांखालील वजन गटात सात वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकले. आरजू मुलाणी हिने ३७ किलो वजन गटात व १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. सोहम शशिकांत भांगे याने ५५ किलो वजन गटात १७ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदकाची कमाई केली. समर्थ तानाजी घुगे याने ४८ किलो वजन गटात व १९ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. आदेश अनिल रणदिवे याने ४२ किलो वजन गटात व १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक जिंकले. अक्षरा अनिल इंगळे हिने ४७ किलो वजन गटात व १४ वर्षांखालील वयोगटात रौप्यपदक संपादन केले.

अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत ३३ जिल्ह्यातील ९२७ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात आरोही स्पोर्ट क्बलच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले आहे.


आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, सूर्यप्रकाश मुंडापाट, अनिल मिरकर, सतीश राजहंस, कृष्णा ढोबळे, रणजीत कटडे, विशाल सिंग, प्राचार्य मोरे, संजय शिंदे, फरड यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना श्रीकांत पुजारी, रामचंद्र करणवर, ओंकार वागज, सिद्धेश्वर रणदिवे, बिरुदेव पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.