
छत्रपती संभाजीनगर : टी १० राज्य क्रिकेट स्पर्धा गोंदिया येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यचा टी १० क्रिकेट संघ निवडण्यासाठी १६ मार्च रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
टी १० राज्य क्रिकेट स्पर्धा १४ वर्ष मुले, १६ वर्ष मुले, १९ वर्ष मुले अशा तीन वयोगटात होणार आहे. ही निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथील विनोद माने क्रिकेट अकॅडमीत १६ मार्च रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.
या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, जन्माचा दाखला सोबत आणावा. तसेच रजिस्ट्रेशन फिस प्रत्येक खेळाडूला ३०० रुपये भरावे लागेल. या संघाची निवड विनोद माने, रणजीत पवार, अनिल मोरे, अनिल पवार यांची निवड समिती करणार आहे.
या निवड चाचणीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष प्रा एकनाथ साळुंके व सचिव अभिजीत साळुंके, सहसचिव विनोद माने यांनी केले आहे. निवड चाचणी सुरळीत पार पाडण्यासाठी विनोद माने, डी आर खैरनार, प्रा राकेश खैरनार, अनिल निळे, हरी गायके परिश्रम घेत आहेत.