
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः महेश निकम सामनावीर, महेश तरडेचे आक्रमक अर्धशतक
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एनआरबी संघाने गुड इयर संघावर चुरशीच्या सामन्यात १९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात एनआरबी संघाच्या महेश निकम याने सामनावीर किताब संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. गुड ईयर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. एनआरबी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सहा १७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुड ईयर संघ २० षटकात पाच बाद १५३ धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. एनआरबी संघाने १९ धावांनी सामना जिंकत आगेकूच कायम ठेवली.
या सामन्यात ऋषिकेश तरडे याने ४१ चेंडूत ५४ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. तरडे याने सात चौकार मारले. महेश निकम याने अवघ्या २१ चेंडूत ४४ धावांची वेगवान खेळी करत मैदान गाजवले. महेशने दोन उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. शशिकांत पवार याने २७ चेंडूंचा सामना कर ३४ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व एक चौकार मारला. गोलंदाजीत जितेंद्र निकम याने ३१ धावांत तीन विकेट घेत आपला ठसा उमटवला. संदीप राठोड याने २१ धावांत दोन बळी घेतले. जय हारदे याने १८ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः एनआरबी संघ ः २० षटकात सहा बाद १७२ (सचिन शेडगे १८, विनोद लांबे २५, शशिकांत पवार ३४, शुभम हरकळ २०, संदीप राठोड ९, महेश निकम नाबाद ४४, राहुल दांडगे नाबाद ९, जितेंद्र निकम ३-३१, अविष्कार नन्नावरे १-३६, जय हारदे १-१८, ऋषिकेश तरडे १-२५) विजयी विरुद्ध गुड ईयर संघ ः २० षटकात पाच बाद १५३ (ऋषिकेश तरडे ५४, अर्जुन राजा २१, जय हारदे २२, अविष्कार नन्नावरे नाबाद २०, सागर दुबे ६, संदीप राठोड २-२१, सचिन शेडगे १-३३, राहुल दांडगे १-३२). सामनावीर ः महेश निकम.