
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः डॉ मयूर राजपूत सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एमजीएम संघाने चुरशीच्या लढतीत डॉक्टर्स इलेव्हन संघाचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात डॉ मयूर राजपूत याने सामनावीर किताब संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. एमजीएम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १९.५ षटकात सर्वबाद १९२ असा धावांचा डोंगर उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना डॉक्टर्स इलेव्हन संघाने २० षटकात सात बाद १७९ धावा काढल्या. विजयासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, एमजीएम संघाने १३ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात डॉ मयूर राजपूत याने ३६ चेंडूत ५९ धावांची दमदार खेळी केली. त्याने तीन उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. अमित पाठक याने ४१ चेंडूत ५८ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. अमितने एक षटकार व सात चौकार मारले. राजेश चौधरी याने २७ चेंडूत सहा चौकारांसह ४५ धावा फटकावल्या. गोलंदाजीत डॉ मयूर राजपूत याने ३३ धावांत दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. त्यामुळे सामनावीर किताब प्रदान करण्यात आला. अब्दुल शेख याने ३५ धावांत दोन तर मनोज ताजी याने ३६ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः एमजीएम संघ ः १९.५ षटकात सर्वबाद १९२ (अमित पाठक ५८, सुमित लोंढे २३, डॉ मयूर राजपूत ५९, अक्षय बनबकर ११, लक्ष्मण सूर्यवंशी ५, डॉ आर्यन केंद्रे ६, इतर २५, डॉ संतोष बनकर २-२०, मनोज ताजी २-३६, स्वप्नील मोताळे १-१५, राजेश चौधरी १-२९, सम्राट गुट्टे १-२८, राजेंद्र चोपडा १-३९) विजयी विरुद्ध डॉक्टर्स इलेव्हन ः २० षटकात सात बाद १७९ (डॉ कार्तिक बाकलीवाल ५, डॉ सुनील काळे २३, डॉ ज्ञानेश्वर बनकर ३१, आकाश दुकाळे २९, डॉ संतोष बनकर ६, राजेश चौधरी नाबाद ४५, मनोज ताजी नाबाद १८, इतर २०, डॉ मयूर राजपूत २-३३, अब्दुल शेख २-३५, डॉ आर्यन केंद्रे १-३२, सागर शेवाळे १-२६, अमित पाठक १-३३). सामनावीर ः डॉ मयूर राजपूत.