
एम बी पटेल, नागपूर शारीरिक शिक्षण कॉलेज संघ विजेते
नागपूर : नागपूर विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात हिस्लॉप कॉलेज (नागपूर) संघाने दुहेरी मुकुट संपादन केला. पुरुष गटात एम बी पटेल कॉलेज (सालेकसा) आणि नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय या संघांनी विजेतेपद पटकावले.

आंतर महाविद्यालयीन सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धा महिला व पुरुष विभागात रेगु इव्हेंट, दुहेरी इव्हेंट अशा दोन प्रकारात घेण्यात आली.
अंतिम निकाल
महिला विभाग
रेगु इव्हेंट : १. हिस्लॉप कॉलेज नागपूर, २. धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर, ३. रामकृष्ण वाघ कॉलेज बोखारा.
दुहेरी इव्हेंट : १. हिस्लॉप कॉलेज नागपूर, २. धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर, ३. रामकृष्ण वाघ कॉलेज बोखारा.
पुरुष विभाग
रेगु इव्हेंट : १. एम बी पटेल कॉलेज सालेकसा, २. यशवंत महाविद्यालय वर्धा, ३. नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर.
दुहेरी इव्हेंट :१. नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर, २. हिस्लॉप कॉलेज नागपूर, ३. धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर.