
छत्रपती संभाजीनगर : लिंबे जळगाव येथील अजित सीड्स प्रा लि संचलित सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने जागतिक किडनी (मूत्रपिंड) दिनानिमित्त भव्य असे मोफत तपासणी आणि उपचार शिबिराचे आयॊजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दयानंद मोतीपवळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर, घाटी विभाग प्रमुख डॉ मीनाक्षी भट्टाचार्य, घाटी विभाग प्रमुख डॉ भारत सोनवणे, किडनीतज्ञ डॉ आदित्य येळीकर, गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ रंगनाथ तुपे, डॉ अर्जुन मोरे, डॉ प्रशांत दाते, डॉ हर्षल धाबे, डॉ अश्विनी फुटणकर, सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय संचालिका स्नेहल समीर मुळे, अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, डॉ सुहास बावीकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ दयानंद मोतीपवळे म्हणाले की, ‘जागतिक किडनी (मूत्रपिंड) दिन हा एक जागतिक आरोग्य जागरूकता उपक्रम आहे, जो निरोगी मूत्रपिंडांचे महत्त्व, मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्य समस्या कमी करणे आणि नवीन उपचारांबद्दल जागरूकता वाढवणे सध्या, जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे मूत्रपिंडाशी संबंधित आजार. या सर्व कारणांमुळे मूत्रपिंडाच्या आजारांबद्दल, उपचारांची उपलब्धता आणि लवकर प्रतिबंध याबद्दल जागरूकता वाढणे आवश्यक आहे. मूत्रपिंड दिनानिमित्त, अनेक संस्था, विशेषतः आरोग्य आणि निरोगीपणामध्ये काम करणाऱ्या संस्था, जागरूकता मोहिमा आणि आरोग्य शिबिरे आयोजित करतात. नियमित व्यायाम करा, नियमित व्यायाम हा एखाद्याच्या एकूण आरोग्यासाठी चांगला असला तरी, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की नियमित व्यायामामुळे मूत्रपिंडाशी संबंधित समस्या टाळता येतात.’
डॉ अभय धानोरकर म्हणाले की, ‘मोफत शिबिरांमध्ये रुग्णांकडून कुठल्या प्रकारची ‘फी’ आकारली जात नसून अल्पदरात विविध उपचार उपलब्ध आहेत. या रुग्णालयाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आपल्या घराजवळ सहज साध्य आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये विविध उपचार पद्धती आणि उपाययोजना केल्या जात आहेत. सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रोज अनेक गुंतागुंतीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पडत आहे.
सर्वसामान्यांना परवडणारी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा ध्यास राहिलाय, अशी भावना सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या संचालिका स्नेहल समीर मुळे यांनी व्यक्त केली आहे.
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेतील सातत्य राखण्याने आज प्रगत शहरातील तसेच राज्यातूनही तज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी सीएसएमएसएस सोबत जोडले गेले आहेत. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे उद्देशाने सुरू केलेल्या हॉस्पिटलमध्ये आज शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली आहे.
निरोगी खा आणि सोडियमचे सेवन कमी करा. निरोगी खाण्याचा एक मुख्य भाग म्हणजे मीठाचे सेवन कमी करणे. जागतिक आरोग्य संघटना शिफारस करते की प्रौढांनी दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ घ्यावे, हे दोन ग्रॅमपेक्षा कमी सोडियमच्या समतुल्य आहे. निरोगी द्रव पदार्थांचे सेवन करा. दररोज १.५ ते २ लिटर पाणी प्या. पाण्याचे चांगले सेवन केल्याने मूत्रपिंड युरिया आणि अतिरिक्त सोडियम सारख्या विषारी पदार्थांपासून मुक्त होतात. मूत्रपिंड तपासणी करा. असे आवाहन किडनीतज्ञ डॉ सुहास बावीकर यांनी केले.
यावेळी डॉ सुभाष भोयर, डॉ भास्कर खैरे, डॉ राजेंद्र प्रधान, संजय अंबादास पाटील आणि विभागप्रमुख, रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.