
पहिल्यांदाच ६० पदकांची कमाई
सोलापूर : राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी तब्बल ६० पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली.
अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, इंडियन किक बॉक्सिंग फेडरेशन (वाको) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ३३ जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून ४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला व तब्बल ६० पदकाची कमाई केली. या आधी सोलापूर जिल्ह्याने अशी कामगिरी केली नव्हती. त्यामुळे या शानदार कामगिरीबद्दल जिल्हाभर कौतुक होत आहे.
या सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, सांगोलाचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, सभापती विजयराज दादा डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, महाराष्ट्र किंग बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष निलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, उपाध्यक्ष अनिल मिरकर, सूर्यप्रकाश मुंडापाठ, सतीश राजहंस, कृष्णा ढोबळे, रणजीत कठडे, शुभम मिश्रा, आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी, शारीरिक शिक्षण महासंघ सोलापूरचे सचिव संजय शिंदे, सोलापूर जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत पुजारी, सचिव रामचंद्र करणवर यांनी पदक विजेत्यां अभिनंदन केले.
या सर्व खेळाडूंना ओंकार वागज, आदित्य बंडगर, योगेश शिंदे, साहिल ढगे, गणेश काशीद, बिरुदेव पुजारी, सिद्धेश रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पदक विजेते खेळाडू
सुवर्णपदक : आरजू मुलाणी, कृतिका काशीद, सिद्धेश्वरी काशीद, पूनम जाधव, समर्थ घुगे, समर्थ गायकवाड, विग्नेश ठोकळे, सार्थक घाडगे, ओम बाबर, सोहम भांगे.
रौप्य पदक : आरोही श्रीकांत पुजारी, प्रणाली महाडिक, सई बाबर, श्रावणी बाबर, अक्षरा अनिल इंगळे, श्रमिका जाधव, तनिशा वाघमारे, वैष्णवी बाबर, वैष्णवी पाटील,
श्रेयश गळवे, यशराज गायकवाड, आदेश अनिल रणदिवे, आकाश पावणे, रोहन पाटील, सुयश खरात.
कांस्यपदक : अनुष्का काकडे, शालिनी उतळे, श्रुतिका गव्हाणे, सिद्धी रास्ते, स्नेहल अडतराव, अथर्व काशीद, प्रसाद महाडिक, सार्थक वाघमारे, सूर्योदय गुजले, स्वराज वाघमारे, प्रथमेश दुधाळ, सक्षम उतळे, श्रेयस घाडगे.
सहभागी खेळाडू : अथर्व जाधव, शुभम खंडागळे, विराज बाबर, सानिका पावणे, हर्षद खरात, समर्थ घोडके.