
आनंद ठेंगे, आयुष बिरादार, व्यंकटेश काणे, सचिन लव्हेरा, सोहम शिंदे चमकले
नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत प्रेसिडेंट इलेव्हन संघाने नाशिक संघाचा पहिल्या डावाच्या आघाडीवर बाजी मारली. निर्धारित वेळेत हा सामना अनिर्णित राहिला.
पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. नाशिक संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, नाशिकचा पहिला डाव २३.५ षटकात अवघ्या १११ धावांत गडगडला. त्यानंतर प्रेसिडेंट इलेव्हन संघाने ८८.२ षटकात सर्वबाद ३८८ धावसंख्या उबारुन पहिल्या डावात २७७ धावांची आघाडी घेत वर्चस्व संपादन केले. नाशिकने दुसऱ्या डावात ३४ षटकात पाच बाद १६८ धावा फटकावत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले.

या सामन्यात सोहम शिंदेचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. सोहमने ९६ धावा काढल्या. त्याने एक षटकार व १३ चौकार मारले. ओमकार यादव याने ६४ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. व्यंकटेश काणे याने ४९ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने सात चौकार व एक षटकार मारला. सचिन लव्हेरा याने ४६ धावांची आक्रमक खेळी केली. सचिनने पाच चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत आयुष बिरादार (५-४५) व आनंद ठेंगे (५-६२) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी पाच विकेट घेत सामना गाजवला. तन्मय शिरोडे याने ७७ धावांत तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : नाशिक : पहिला डाव : २३.५ षटकात सर्वबाद १११ (साहिल पारख २५, मुर्तजा ट्रंकवाला ८, कुणाल कोठावदे ९, रवींद्र माचा २३, कृष्णा केदार १९, प्रतीक तिवारी ११, प्रथमेश कसबे ६, आनंद ठेंगे ५-६२, आयुष बिरादार ५-४५).
प्रेसिडेंट इलेव्हन : पहिला डाव : ८८.२ षटकात सर्वबाद ३८८ (सोहम शिंदे ९६, सचिन लव्हेरा ४६, ओंकार यादव ६४, मोहित नेगी २६, आनंद ठेंगे ३४, अभिषेक आंब्रे ३२, स्वराज वाबळे नाबाद १५, इतर २२, तन्मय शिरोडे ३-७७, सुयोग मंडलिक २-७८, कृष्णा केदार २-९०, प्रथमेश कसबे १-५६, प्रतीक तिवारी १-५१).
नाशिक : दुसरा डाव : ३४ षटकात पाच बाद १६८ (साहिल पारख १४, शेख यासर ४८, कुणाल कोठावदे २६, प्रथमेश कसबे २२, रवींद्र माचा नाबाद २१, मुर्तजा ट्रंकवाला नाबाद २६, आयुष बिरादार २-३७, अभिषेक आंब्रे २-३३, व्यंकटेश काणे १-११). सामनावीर : आयुष बिरादार.