धाराशिव, पुणे, सांगलीचे पुरुष व महिला संघ उपांत्य फेरीत

  • By admin
  • March 15, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

हिरक महोत्सवी राज्य पुरुष व महिला खो-खो अजिंक्यपद स्पर्धा 

शेवगाव  : हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुरुष गटामध्ये पुणे विरुद्ध सांगली, मुंबई उपनगर विरुद्ध धाराशिव तर महिला गटामध्ये धाराशिव विरुद्ध पुणे आणि सांगली विरुद्ध नाशिक असे सामने रंगणार आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अहमदनगर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान, मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर, शेवगाव येथे हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा खंडोबा क्रीडांगणावर उत्साहात सुरू आहे.

पुरुष गटातील उपांत्यपूर्व सामने चुरशीचे शनिवारी सकाळच्या सत्रात पुरुष गटातील उप उपांत्य सामन्यात पुण्याने अहिल्यानगर संघावर १ डाव १० गुणांनी (१५-१०) मात केली. त्यामध्ये विजयी संघातर्फे अथर्व देहेन (३ मि. संरक्षण), शुभम थोरात (२.३०, १ मि. संरक्षण व १ गुण), साहिल चिखले (१.५० मि. संरक्षण व ३ गुण), सिद्धार्थ पवार (१ मि. संरक्षण व ३ गुण) यांनी चांगला खेळ केला. अहिल्यानगर संघातर्फे नरेंद्र कातकडे (२.१०, १.२० मि. संरक्षण व ३ गुण), सारंग लबडे (१.३० मि. संरक्षण व ३ गुण) व कृष्णा कोपनार (१ मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात धाराशिव संघाने ठाण्याचा २ गुण आणि २ मिनिटे ५० सेकंद राखून (२०-१८) पराभव केला. विजयी संघातर्फे विजय शिंदे (१.३०, १.५० मि. संरक्षण व ३ गुण), रोहित चव्हाण (१.२०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण), सचिन पवार (१.२०, १.२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पराभूत संघातर्फे लक्ष्मण गवस (१.३० मि. संरक्षण व २ गुण), शुभम उतेकर (१.१०, १ मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला.

तिसऱ्या सामन्यात सांगलीने सोलापूरचा २ गुण व ५.३० मि. राखून (१४-१२) पराभव केला. सांगली संघाकडून मिलिंद चावरेकर (२, १.२० मि. संरक्षण व २ गुण), सागर गायकवाड (१, १.४० मि. संरक्षण), सौरभ घाडगे (१, १.५० मि. संरक्षण), सत्यजित सावंत (१.३०, १.५० मि. संरक्षण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. तर सोलापूर संघाकडून अजय कश्यप (२ मि. संरक्षण व ३ गुण), गणेश बोरकर (१, १.२० मि. संरक्षण व २ गुण), रोहन रजपूत (१.३० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

चौथ्या सामन्यात मुंबई उपनगर संघाने मुंबईचा (१८-१७) २० सेकंद राखून १ गुणाने पराभव केला. चूरशीच्या सामन्यात मुंबई उपनगरतर्फे अनिकेत पोटे (१.५०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), ओंकार सोनवणे (१, १.२० मि संरक्षण व १ गुण), अक्षय भांगरे (१, १.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी मोलाची कामगिरी केली. मुंबईतर्फे श्रेयस राऊळ (१, १.२० मि. संरक्षण व १ गुण), श्रीकांत वल्लकटी (१, १ मि. संरक्षण), वेदांत देसाई (१.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला.

महिलांचे उपांत्यपूर्व फेरीतील धमाकेदार सामने
महिला गटामध्ये पहिल्या सामना सांगली आणि रत्नागिरी यांच्यात चुरशीचा झाला. सांगलीने १ गुणाने (१३-१२) विजय मिळवला. सानिका चाफे (२.३०, १.४० मि. संरक्षण व ३ गुण), रितिका मगदूम (५ गुण), प्रतीक्षा बिराजदार (१.४०, २.४० मि, संरक्षण) यांनी सांगलीकडून महत्वाची खेळी केली. तर पराभूत संघातर्फे रत्नागिरी कडून पायल पवार (१.५०, २.३० मि. संरक्षण व २ गुण), अपेक्षा सुतार (१.५०, २.२० मि. संरक्षण), दिव्या पालये (३ गुण) यांनी चांगला खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात पुण्याने सोलापूरचा १०-८ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. त्यात श्वेता वाघ (३.२० मि. संरक्षण), प्रियांका इंगळे (३, २ मि. संरक्षण व ३ गुण), स्नेहा महाले (२ मि. संरक्षण व १ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. तर सोलापूरकडून स्नेहा लामकाणे (१.३० मि. संरक्षण व २ गुण), साक्षी देठे (१ मि. संरक्षण) यांनी चांगली कामगिरी केली.

तिसऱ्या सामन्यात धाराशिव संघाने मुंबईचा १ डाव १२ गुणांनी (१७-५) असा पराभव केला. त्यात विजयी संघाकडून संध्या सुरवसे (५, ४ मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (६ गुण), अश्विनी शिंदे (२.५० मि. संरक्षण व ३ गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ केला.

चौथ्या सामन्यात नाशिकने ठाण्याचा (९-८) १ गुणांने पराभव केला. विजयी संघातर्फे ज्योती मेढे (२, १.२० मि. संरक्षण व २ गुण), मनीषा पवार (२.५०, ३ मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर ठाणे संघाकडून रेश्मा राठोड (२.२०, ३.३० मि. संरक्षण व २ गुण), दीक्षा काटेकर (१.१०, २.१० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *