राष्ट्रीय साम्बो बीच अजिंक्यपद स्पर्धा २९ मार्चपासून

  • By admin
  • March 16, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

सरचिटणीस राम शर्मा यांची माहिती 

नवी दिल्ली ः हरियाणा साम्बो कुस्ती संघटनेतर्फे २९ ते ३१ मार्च या कालावधीत राष्ट्रीय साम्बो बीच अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती द साम्बो फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस राम शर्मा यांनी दिली. 

राष्ट्रीय साम्बो बीच अजिंक्यपद स्पर्धा विविध वजन गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशातील सर्व राज्य साम्बो संघटना, क्लब, अकादमी सहभागी होऊ शकतील. राष्ट्रीय साम्बो बीच अजिंक्यपद स्पर्धा विजय इंटरनॅशनल स्कूल, महेंद्रगड, हरियाणा या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती सरचिटणीस राम शर्मा यांनी दिली.


ही स्पर्धा एसएफआय नियमानुसार घेतली जाणार आहे. प्रत्येक खेळाडूसाठी प्रवेश शुल्क ३५०० रुपये आहे. राज्य संघासह एकापेक्षा अधिक प्रतिनिधींसाठी प्रत्येक प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त शुल्क १५०० रुपये असेल. पालकांसाठी अतिरिक्त शुल्क १५०० रुपये आहे. राज्य संघटनेला तात्पुरत्या संलग्नतेसाठी १५ हजार रुपये भरावे लागतील. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक राज्य संघटनेला वार्षिक वर्गणीसाठी १० हजार रुपये भरावे लागतील, अशी माहिती सरचिटणीस राम शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

सर्व राज्य सांबो असोसिएशन, क्लब, अकादमी यांनी संघ सदस्यांचा अंतिम प्रवेश अर्ज २५ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावा. सर्व संघांनी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन, बसस्टँड महेंद्रगड येथे पोहोचावे. रेल्वे स्टेशन, बसस्टँड ते विजय इंटरनॅशनल स्कूल पर्यंत वाहतूक, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाईल अशी माहिती साम्बो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे देण्यात आली आहे.

ही स्पर्धा स्पोर्ट साम्बो (लाल/निळा), कॉम्बॅट साम्बो (लाल/निळा) अशा प्रकारात होईल. खेळाडूंनी आधार कार्ड, कुटुंब ओळखपत्र, दहावीवी मार्कशीट आणि ४ पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावेत. प्रवेश अर्जासोबत देखील पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९०३४९९९९८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सरचिटणीस राम शर्मा यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *