महिला मॅरेथॉन स्पर्धेत एक्सलंट तायक्वांदो अकादमीचे घवघवीत यश

  • By admin
  • March 16, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

६२ मुली, महिलांचा सहभाग 

मुंबई ः सीए वुमन्स मॅरेथॉन स्पर्धेत एक्सलंट तायक्वांदो अकादमीच्या ६२ मुलींनी व महिलांनी सहभाग नोंदविला. ही मॅरेथॉन स्पर्धा मॅक्सेस मॉल मीरा-भाईंदर, ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.

मॅरेथॉन दोन गटांमध्ये मुली आणि व महिलांकरिता अडीच किलोमीटर व पाच किलोमीटर अशा गटामध्ये मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. उत्कृष्ट संख्येने एक्सलंट तायक्वांदो अकादमीच्या मुलींनी व महिलांनी सहभाग नोंदवला. या सर्व मुलींनी व महिलांनी पूर्वतयारी करून स्पर्धेत भाग घेतला होता. प्रशिक्षक कांचन गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला व मुलींना धावण्याचे तंत्र तसेच व्यायाम शिकविण्यात आले होते व पूर्वतयारी म्हणून आठ दिवस प्रशिक्षण देखील देण्यात आले होते. सर्व महिलांनी व मुलींनी उत्कृष्ट कामगिरी बजावत सीए वुमन्स मॅरेथॉन येथे उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले. तसेच मॅरेथॉन मध्ये उत्कृष्ट पदके व सन्मान पत्र मिळवले. 

कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर व त्यांच्या टीमचे सीए दया बन्सल (मुख्य आयोजक) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मॅरेथॉनचे उद्घाटन माजी आमदार गीता जैन यांच्या हस्ते करण्यात आले. सहभागी मुली व महिलांचे राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

या मॅरेथॉन स्पर्धेत अमृता कुलकर्णी, अंजली नांदावडेकर, अनुपमा सिंह, अन्विता सावंत, अश्विनी सावंत, अवनी हळदे, बबिता नेगी, भूमी दंडवते, चंचल गुप्ता, धारा शुक्ला, दीप्ती करवा, देवियानी गांगुर्डे, जान्हवी जंगम, कादंबरी कदम, कांचन गवंडर, कविता आर्य, काव्या गवंडर, कोमल हिंमत सिंह, क्रिष्णा शुक्ला, क्षितिजा नांदवडेकर, लेखा आगेडकर, माही व्हळे, ममता पाणंदीकर, मनाली हळदे, मंगल गवंडर, मोनिका तिरुवा, निकिता शुक्ला, नीती वेलानी, ओजस्वी पाणंदीकर, पियुषा जैन, पूजा जैन, पूजा भारती, प्राची व्हळे, प्रगती बारगोडे, प्राप्ती तिवारी, प्रीती रावत, प्रियदर्शनी वैऊडे, प्रिशा शुक्ला, पूर्ती जैन, रीना अग्रवाल, रीता गणवीर, साक्षी जंगम, समिता तिरुवा, समृद्धी जाधव, सानिध्या मिश्रा, सानू मिश्रा, सारिका पांडे, सीमा कदम, शर्वरी धुरी, स्नेहल अगेडकर, शुभांगी गांगुर्डे, शोभा दंडवते, सोनाली जाधव, सौम्या गुप्ता, सुनिता चौधरी, सुनिता राणा, स्वाती पांडे, तनिष्का पाणंदीकर, ताशु अग्रवाल, वर्षा वेलानी, विबा अग्रवाल, युक्ती जंगम, प्रियदर्शनी वैऊडे आदींनी सहभाग घेत लक्षवेधक कामगिरी बजावली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *