
मुंबई ः एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंचा कलर बेल्ट वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये ७२ खेळाडूंनी बेल्ट प्रमोशन परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता त्या सर्व खेळाडूंनी अतिशय उत्कृष्टपणे गुण मिळवून पुढील बेल्ट साठी पात्र ठरले.
यामध्ये येलो बेल्ट, ग्रीन, ग्रीन १, ब्ल्यू, ब्ल्यू १ व रेड कलर बेल्ट साठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व यामध्ये सहभागी असलेले सर्व खेळाडू चांगल्या गुणांनी पास झाले. या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी व त्यांना कलर बेल्ट देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा कंपनी ऑफ ग्रुप्सचे कौन्सिलर व ट्रेनर डॉ. सचिन मांजरेकर, शिवसेना संघटक निशाताई नार्वेकर (मीरा-भाईंदर ठाणे), चैतन्य विश्व संस्थापक नेहल व्यास उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांनी सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक गजेंद्र गवंडर यांनी केले. कांचन गवंडर यांनी आभार मानले.
यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि कलर बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गजेंद्र गवंडर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे आणि पालकांचे आभार मानले.
सर्व खेळाडूंनी आपली परीक्षा उत्कृष्टपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक नीरज बोरसे, लता कलवार, ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलिल झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य प्रमोद कदम यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पालकांचे देखील अभिनंदन केले.
बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंची नावे
यलो बेल्ट ः शौर्य धुरी, देवांश रावत, निष्का सनिल, इविका त्रिपाठी, माही रजक, समर्थ त्रिपाठी, प्रिशा शुक्ला, मंथन रावत, व्रिशा बारगोडे, मोहित तिरुवा, अनीश लोहार, मोनिका तिरुवा, अनशिका लोहार, शिवानी रजक, आर्य तिवारी, माही व्हळे, अद्विक अग्रवाल, शौर्य जैन, सौम्या गुप्ता.
ग्रीन बेल्ट ः काव्या गवंडर, रुषिकेश कुलकर्णी, राघवेंद्र कुलकर्णी, सौम्या गुप्ता, तन्मय कदम, साक्षी पत्र, विराज पांडे, विक्रांत पांडे, सावी खोपकर, देवांशी मेस्त्री, अंशुया सुथार, किशन सुथार, चरण मेस्त्री, तृषा सिंग, युवराज सिंग.
ग्रीन १ बेल्ट ः क्षितिज सोनवणे, दिवीत पुजारी, विबा अग्रवाल, हार्दिक आर्य, कादंबरी कदम, अविक्षा नंदी, लोहित कुंदर, रामकृष्णन कोनार, क्षितिजा पाटील, पार्थ चौधरी, प्रणय चनाल, गुन्मय चनाल.
ब्लू बेल्ट ः स्वरा मोहिते, प्रणील नांदवडेकर, क्षितिजा नांदवडेकर, विदिशा करवा, सक्षम भारुड, तनिष्का पाणंदीकर, समृद्धी जाधव, आदित्य सुरेंद्रन, खुशी तिवारी.
ब्लू १ बेल्ट ः अमृता कुशवाह, शौर्य गणवीर, निती वेलानी, स्वरा मोहिते, दिव वेलानी, अनिकेत कुलकर्णी, अमृता कुलकर्णी, पार्थ आगेडकर, लेखा आगेडकर, श्लोक नेगी, अन्विता सावंत, मोहम्मद.अशहर शेख, ओजस्वी पाणंदीकर, पूर्ती जैन, पियुषा जैन.
रेड बेल्ट ः विवान माने, क्रिष्णा शुक्ला, श्रुतिप्रज्ञान साहू, जान्हवी जंगम.