
छत्रपती संभाजीनगर ः ग्रामोद्यौगिक शिक्षण मंडळाच्या एमआयटी महाविद्यालयातर्फे गोल्डन ज्युबली लेक्चर सिरीज आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
एमआयटी महाविद्यालय परिसरातील एमआयटी कॅम्पस गेटन नंबर ८ येथील मंथन सभागृहात सोमवारी दुपारी चार ते पाच या वेळेत डॉ आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा यांनी दिली.