
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः अजय शितोळे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत डीबीए संघाने फार्मा स्ट्रायकर्स संघाचा ६१ धावांनी पराभव केला. या सामन्यात अजय शितोळे याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. फार्मा स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डीबीए संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १६६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना फार्मा स्ट्रायकर्स संघ १८.४ षटकात १०५ धावांत सर्वबाद झाला. डीबीए संघाने ६१ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात अजय शितोळे याने ४२ चेंडूत ६२ धावांची दमदार खेळी केली. अजय याने ९ चौकार मारले. सतीश काळुंके याने अवघ्या ३६ चेंडूत ५० धावांचा दमदार अर्धशतकी खेळी केली. सुरज याने १७ चेंडूत २८ धावांची आक्रमक खेळी केली. सुरजने सहा चौकार मारले. गोलंदाजीत सतीश काळुंके याने ३० धावांत तीन विकेट घेतल्या. अजय शितोळे याने ६ धावांत दोन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. हरमितसिंग रागी याने २६ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः डीबीए संघ ः २० षटकात सात बाद १६६ (सुरज एम २८, अजय शितोळे ६२, गौरव शिंदे २८, हरमितसिंग रागी ११, सुनील भोसले ५, सत्यजित वकील नाबाद ७, धनंजय कांबळे नाबाद ४, इतर १७, सतीश काळुंके ३-३०, संजय बनकर २-२९, शिवाजी झिंजुर्डे १-२६, आशिष भारुका १-३५) विजयी विरुद्ध फार्मा स्ट्रायकर्स ः १८.४ षटकात सर्वबाद १०५ (धीरज थोरात १५, विवेक घुले ९, सतीश काळुंके ५०, अमोल ढेंगळे ६, इतर १५, अजय शितोळे २-६, हरमितसिंग रागी २-२६, मोहित घाणेकर १-२६, दिनकर काळे १-१७). सामनावीर ः अजय शितोळे.