
छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय टी १० क्रिकेट स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा टी १० संघ निवडण्यसााठी २२ व २३ मार्च रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय क्रीडा संकुलात विनोद माने क्रिकेट अकादमी येथे २२ व २३ मार्च रोजी दुपारी चार वाजता निवड चाचणी घेतली जाईल. या निवड चाचणीत १४, १६ व १९ वर्षांखालील मुले सहभागी होऊ शकतील.
या निवड चाचणीतून गोंदिया येथे १८ ते २० एप्रिल या कालावधीत होणाऱया चौथ्या टी १० राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ निवडला जाईल. तसेच दिल्ली येथे होणाऱया राष्ट्रीय नाईन ए साईड क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १९ वर्षांखालील खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. खेळाडूंनी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, जन्माचा दाखला सोबत आणावा. नोंदणी शुल्क प्रत्येकी ३०० रुपये ठेवण्यात आली आहेत.
या संघाची निवड करण्यासाठी विनोद माने, अनिल मोरे, मयुरी गायके, अनिल पवार, हरी गायके यांची निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष प्रा एकनाथ साळुंके व सचिव अभिजीत साळुंके, सहसचिव विनोद माने यांनी केले आहे. निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी डी आर खैरनार, प्रा राकेश खैरनार, डॉ रणजीत पवार, अनिल निळे, रेखा साळुंके परिश्रम घेत आहेत.
अधिक माहितीसाठी विनोद माने (94222 91890), अभिजीत साळुंके (8446428342) यांच्याशी संपर्क साधावा.