
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः रुषिकेश नायर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्यगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मेटलमन संघाने शेंद्रा कंबाईंड इंडस्ट्रीज संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात रुषिकेश नायर याने सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. शेंद्रा कंबाईंड इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात सर्वबाद ११५ असे माफक लक्ष्य उभे केले. मेटलमन संघाने १५.१ षटकात दोन बाद ११९ धावा फटकावत आठ गडी राखून मोठा विजय मिळवला.

या लढतीत रुषिकेश नायर याने ४१ चेंडूत ५७ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. नायर याने सहा चौकार व दोन उत्तुंग षटकार मारले. पवन कावळे याने २५ चेंडूत ३० धावा काढल्या. पवन याने दोन षटकार व दोन चौकार मारले. प्रवीण नागरे याने एक षटकार व चार चौकारांसह २६ धावांची आक्रमक खेळी केली. गोलंदाजीत सोमिनाथ कुबेर (२-१८), रुषिकेश नायर (२-२०) व आर एस गायकवाड (२-२२) यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः शेंद्रा कंबाईंड इंडस्ट्रीज ः २० षटकात सर्वबाद ११५ (प्रवीण नागरे २६, विजू गोडसे १२, राहुल पाटील ७, पवन कावळे ३०, सहज लांबा १६, बन्सी राजपूत नाबाद ११, इतर १३, आर एस गायकवाड २-२२, रुषिकेश नायर २-२०, सोमिनाथ कुबेर २-१८, अनिकेत काळे १-२५, ध्रुव १-१३) पराभूत विरुद्ध मेटलमन संघ ः १५.१ षटकात दोन बाद ११९ (अनिल याद १५, रुषिकेश नायर नाबाद ५७, ध्रुव नाबाद २२, इतर २४, संदीप तुपे १-१४, बन्सी राजपूत १-१३). सामनावीर ः रुषिकेश नायर.