अंबाजोगाई मॅरेथॉन स्पर्धेत प्रणिता माने, वैष्णवी गडदे, प्रिया तिडके, सविता पाटील प्रथम

  • By admin
  • March 17, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

अंबाजोगाई ः अंबाजोगाई येथील रोटरी, इनरव्हील व रोटरॅक्ट क्लब आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित केलेल्या महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय खेळाडू व नायब तहसीलदार स्मिता बाहेती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोदी, डॉ सुलभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी चौकात मिनी मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. संत भगवानबाबा चौकात विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले

पाचवी ते दहावी गटात प्रणिता माने प्रथम, सोनल भिवगुडे द्वितीय, अंजली केंद्रे तृतीय व अनुष्का करंडेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. १८ ते २५ वयोगटात वैष्णवी गडदे प्रथम, सुप्रिया चिरके द्वितीय, तनुजा देशमुख तृतीय व वैष्णवी कोल्हापूरे उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. २६ ते ४९ वयोगटात डॉ प्रिया तिडके प्रथम, सीमा उणवणे द्वितीय, सारिका नायबळ तृतीय व ललीला मगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ५० ते ७० वयोगटात सविता पाटील प्रथम, उषा यादव द्वितीय, कल्पना लोहिया तृतीय व अनिता शेटकार यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

या स्पर्धेत पंच म्हणून क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे, क्रीडा समन्वयक दत्ता देवकते, मनेश गोरे यांनी काम पाहिले. रोटरी क्लबचे कल्याण काळे, प्रवीण चोकडा, गणेश राऊत, डॉ पाचेगावकर, प्रकल्प संचालक स्वरूपा दिग्रसकर, डॉ कल्पना मुळावकर, जगदीश जाजू, रुपेश रामावत, अविनाश मुडेगावकर, इनरव्हील क्लबच्या सुरेखा सिरसाट, संगीता नावंदर, अंजली चरखा, अंजली निर्मळे, रोटरॅक्ट क्लबचे जतीन कर्नावट, सर्वेश बजाज, परदेशी व इतरांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *