
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
नवी दिल्ली ः खेळांमध्ये संपूर्ण जगाला ऊर्जा देण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची शक्ती आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकॉस्ट होस्ट लेक्स फ्रिडमन यांच्या मुलाखतीत व्यक्त केला.
अलिकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा भव्य सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सहा विकेट्सनी पराभव केला आणि स्पर्धेत त्यांचा प्रवास संपवला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केले आहे. अमेरिकन पॉडकास्ट होस्ट लेक्स फ्रिडमन यांच्या मुलाखतीत त्यांनी खेळांबद्दल चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, खेळांमध्ये संपूर्ण जगाला ऊर्जा देण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची शक्ती आहे असा त्यांचा विश्वास आहे. यादरम्यान, जेव्हा मोदींना भारत आणि पाकिस्तानमधील चांगला संघ निवडण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना खेळाचे बारकावे माहित नाहीत आणि फक्त तज्ञच त्यावर भाष्य करू शकतात. मुलाखतीदरम्यान, पंतप्रधान म्हणाले की, माझा असा विश्वास आहे की खेळांमध्ये संपूर्ण जगाला ऊर्जा देण्याची शक्ती आहे. खेळाची भावना वेगवेगळ्या देशांतील लोकांना एकत्र आणते. म्हणूनच मला कधीही खेळाची बदनामी व्हावी असे वाटणार नाही. माझा असा विश्वास आहे की मानवी विकासात खेळांची मोठी भूमिका असते. तो फक्त एक खेळ नाहीये, तो लोकांना खोलवर जोडतो.
भारत आणि पाकिस्तान पैकी कोणता संघ चांगला आहे?
यावेळी पंतप्रधानांनी भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वाबद्दलही भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले की, आता आपण कोण चांगले आहे आणि कोण नाही या प्रश्नाकडे येऊया. खेळाच्या तंत्राचा विचार केला तर मी तज्ञ नाही. जे त्यात तज्ज्ञ आहेत तेच याचा न्याय करू शकतात. कोणता संघ सर्वोत्तम आहे आणि कोणते खेळाडू सर्वोत्तम आहेत हे फक्त तेच ठरवू शकतात. पण कधीकधी, निकाल स्वतःच बोलून जातात. काही दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला आणि निकालावरून कोणता संघ चांगला आहे हे दिसून आले. आम्हाला हे अशा प्रकारे कळले.
पंतप्रधान मोदी मेस्सीला एक चांगला फुटबॉलपटू मानतात
या पॉडकास्टमध्ये, पंतप्रधानांना सर्वोत्तम फुटबॉलपटूबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान म्हणाले की ८० च्या दशकात लोक दिएगो मॅराडोनाला ओळखत होते आणि आता सर्वांना लिओनेल मेस्सी माहित आहे.