
नाशिक ः मालेगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धेत वॉरियर्स फुटसाल संघाने विजेतेपद पटकावले. फुरसत स्पोर्ट्स क्लब संघाने उपविजेतेपद संपादन केले. मालेगाव ७८६ फुटबॉल क्लबने तिसरा क्रमांक मिळवला.
अस्मिता दर्शन महिला मंडळ नाशिक व खेलो मालेगाव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदार संघातील आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांच्या विशेष सहकार्याने मालेगाव येथे जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील व अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. खेळाडूंमध्ये या स्पर्धेच्या आयोजनामुळे अतिशय उत्साहाचे वातावरण होतेय
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत मालेगाव शहरातील खानभाई मुख्तार, तैमूर खाटिक, पुष्पक वाघ, अविनाश वाघ, नेमाडे शिरीष आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा दोन दिवस उत्साहपूर्ण वातावरणात झाली. बक्षीस समारंभासाठी एमआयएम नेते अस्लम मेहमूद रिजवान खान, परवेश शेख यांच्यासह रुपेश खाकरे, पवन महाले, युसूफ काझी आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.