
ज्ञानदा इंग्लिश स्कूलतर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः ज्ञानदा इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानेश्वरी गावंडे, भक्ती गवळी आणि सोनल गायके यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
ज्ञानदा इंग्लिश स्कूल हर्सूल टी पॉइंट येथे घेण्यात आलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त मोफत बुद्धिबळ स्पर्धेत एकूण ५४ महिला व मुलींनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा एकूण तीन गटात खेळविण्यात आली. पहिला गट वर्ग पहिली ते चौथी, दुसरा गट वर्ग पाचवी ते आठवी व महिला गट अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना ज्ञानदा शाळेच्या संस्था चालक मनीषा जोशी, ऋषिकेश जोशी, सीबीएसई मुख्याध्यापिका ममता जैस्वाल, स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका प्रिया जोशी, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत पहिली ते चौथी गटात भक्ती गवळी हिने चार पैकी चार गुण घेऊन विजेतेपद पटकावले तर तीन गुण घेऊन स्वरा लड्डा ही उपविजेती ठरली. तिसरा क्रमांक श्रेया शेळके हिने संपादन केला. कायरा मालानी हिने चौथा आणि जागृती थारेवाल हिने पाचवा क्रमांक मिळवला. याच गटात उत्तेजनार्थ पारितोषिक ओवी द्वारकुंडे, नीलाक्षी कुलकर्णी, अनन्या जयस्वाल, प्रतीती चंडालिया, नेत्रा सुदेवाड यांना देण्यात आले.
पाचवी ते आठवी मुलींच्या गटात सोनल गायके हिने चार पैकी चार गुण घेत विजेतेपद पटकावले. तसेच समृद्धी काळे हिने ३.५ गुणांसह उपविजेतेपद संपादन केले. आराधिता जाधव हिला तीन गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रेणुका गोविंदवर अडीच गुणांसह चौथ्या क्रमांकावर तर सादिका तिवारी ही पाचव्या स्थानावर राहिली. या गटात अनुष्का हातोळे, आदिती वेताळ, उन्मेषा मानूरकर, ध्रुवी वाटोळे, कनिष्का ब्रह्मा यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
महिला गटामध्ये ज्ञानेश्वरी गावंडे तिने पाच पैकी पाच गुण घेऊन विजेतेपद पटकावले. रोशनी रसाळ हिने चार गुणांसह उपविजेतेपद पटकावले. तिसरा क्रमांक संचिता सोनवणे, चौथा क्रमांक सायली खोडे तर पाचवा क्रमांक शर्वरी पैठणकर यांनी पटकावला.
या स्पर्धेत पंचांची भूमिका विलास राजपूत यांनी निभावली. या स्पर्धेसाठी दिनेश शिंदे, श्रेया सांबरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अदिती वेताळ यांनी केले. समीक्षा स्वैन हिने आभार मानले.