
मुंबई ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित ७२व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला बुधवारपासून (१९ मार्च) शानदार प्रारंभ होणार आहे.
ठाणे (पश्चिम) येथील जे के केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर (कॅडबरी कंपनीच्या समोर) १९ ते २३ मार्च या कालावधी ही स्पर्धा होईल. या स्पर्धेची गटवारी तांत्रिक समितीने जाहीर केली आहे. या स्पर्धेत पुरुष गटात सर्व संलग्न जिल्हा संघांचा सहभाग असून महिला गटात धाराशिव व हिंगोली जिल्हा संघांचा सहभाग नाही.
स्पर्धेची गटवारी
पुरुष गट विभागणी : अ गट : पुणे ग्रामीण, बीड, नाशिक शहर.
ब गट : अहिल्यानगर, ठाणे ग्रामीण, नांदेड, हिंगोली.
क गट : नंदुरबार, ठाणे शहर, रायगड, लातूर.
ड गट : पुणे शहर, रत्नागिरी, परभणी, सिंधुदुर्ग.
इ गट : मुंबई उपनगर पूर्व, सांगली, धुळे, सोलापूर.
फ गट : पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगर पश्चिम, नाशिक ग्रामीण, सातारा.
ग गट : कोल्हापूर, मुंबई शहर पश्चिम, जालना, धाराशिव.
ह गट : पालघर, मुंबई शहर पूर्व, जळगाव, छत्रपती संभाजीनगर.
महिला विभाग : अ गट : पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, नांदेड.
ब गट : रत्नागिरी, कोल्हापूर, अहिल्यानगर.
क गट : मुंबई उपनगर पूर्व, सातारा, ठाणे ग्रामीण.
ड गट : पिंपरी चिंचवड, नाशिक शहर, परभणी, जालना.
इ गट : पुणे शहर, नंदुरबार, रायगड, लातूर.
फ गट : पालघर, मुंबई शहर पूर्व, धुळे, बीड.
ग गट : ठाणे शहर, मुंबई शहर पश्चिम, नाशिक ग्रामीण, जळगाव.
ह गट : सांगली, मुंबई उपनगर पश्चिम, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर.