
छत्रपती संभाजीनगर ः पाथ्री येथील राजर्षी शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ राम जाधव यांच्या हेल्थ, वेलनेस, स्पोर्ट्स, फिजिकल फिटनेस अँड योगा एज्युकेशन या पुस्तकाचे प्रकाशन खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष द्वारका भाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ पाथ्रीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील मिरगणे, उपप्राचार्य डॉ शशिकांत बंडेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ राम जाधव हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण संचालक अभ्यास मंडळाचे सदस्य असून त्यांनी सदरील पुस्तक नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संलग्नित सर्व कला, वाणिज्य व विज्ञान पदवी प्रथम वर्षासाठी अनिवार्य अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयोगी असे पुस्तक लिखाण केलेले आहे.
त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाबद्दल संस्थेच्या सचिव उषाताई पाथ्रीकर, सहसचिव वरूण पाथ्रीकर, डॉ रश्मी पाथ्रीकर, डॉ कैलास इंगळे, डॉ सचिन मोरे, डॉ शिवाजी उबरहंडे, डॉ सुरेश अलोने, डॉ दयानंद कांबळे, डॉ सचिन देशमुख, डॉ माधवसिंग इंगळे, डॉ सुहास यादव, डॉ मधुकर वाकळे, डॉ वसंत झेंडे आदींनी अभिनंदन केले.