
मुंबई : ठाणे येथे होत असलेल्या ७२व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई शहरने पश्चिम आणि पूर्व विभागाचे पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत.
इराण येथे नुकत्याच झालेल्या भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळलेली सोनाली शिंगटेकडे मुंबई शहरच्या पश्चिम विभागाचे नेतृत्व सोपविण्यात आले. तर सुशांत साईल याच्याकडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. साहिल राणे व तनु यांच्याकडे पूर्व विभाचे नेतृत्व सोपविण्यात आले.
मुंबई शहर पश्चिम विभाग महिला संघ : सोनाली शिंगटे (कर्णधार), साधना विश्वकर्मा, पौर्णिमा जेधे, श्रद्धा कदम, प्रतिक्षा तांडेल, श्रेया साठे, जागृती घोसाळकर, सलोनी नाक्ती, प्राची भादवणकर, आचल यादव, रोझी डिसोझा, सोनाली नाईक. प्रशिक्षक : भरत मुळे, व्यवस्थापिका : भाग्यश्री भुरके.
पुरुष संघ : सुशांत साईल (कर्णधार), रुपेश साळुंखे, ओमकार मोरे, अजिंक्य कापरे, हर्ष लाड, यश बगल, विनोद अत्याळकर, अवधूत शिंदे, सिद्धेश पिंगळे, सिद्धेश तटकरे, रुपेश कीर, अभिषेक रामाणे. प्रशिक्षक : संजय सूर्यवंशी आणि व्यवस्थापक : शिवाजी बावडेकर.
मुंबई शहर पूर्व महिला संघ : तनु (कर्णधार), सौंदर्या, नंदिनी मौर्या, श्रावणी घाडीगावकर, मेघा कदम, प्रीती हांदे, कादंबरी पेडणेकर, लेखा शिंदे, साक्षी सावंत, साक्षी जंगम, कशीश सावंत, जीवा. प्रशिक्षक : दिनेश पाटील व व्यवस्थापिका : शुभांगी पाटील.
पुरुष संघ : साहिल राणे (कर्णधार), संकेत सावंत, प्रणय राणे, रुपेश माहुरे, करण सावर्डेकर, जतिन विंदे, शार्दुल पाटील, केतन मापेलकर, अमन शेख, तेजस शिंदे, तेजस टक्के, यश पाटील. प्रशिक्षक : सुशील ब्रीद आणि व्यवस्थापक : मिलिंद कोलते.