
नांदेड ः पंजाब राज्यातील मस्तुना साहेब संगरुर येथे होणाऱ्या ३० व्या सब ज्युनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी नांदेडच्या सुधा शिंदे व श्रद्धा कुलुपवाड या दोन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

ही स्पर्धेसाठी २० ते २५ मार्च या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय भातकुली अमरावती येथे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. २६ मार्च रोजी महाराष्ट्राचा संघ संगरुर (पंजाब) येथे २७ ते ३१ मार्च या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना होणार आहे.
या गुणवंत खेळाडूंच्या निवडीबद्दल हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडचे अध्यक्ष प्रशांत अण्णा तिकडे पाटील, उपाध्यक्ष नरसिंग अण्णा आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंची निवड झाली आहे. महाराष्ट्र् बेसबॉल असोसिएशन सचिव राजेंद्र इखनकर, महाराष्ट्र् बेसबॉल असोसिएशन तांत्रिक समिती चेअरमन अशोक सरोदे व हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडचे सचिव आनंदा कांबळे, बालाजी गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघटनेतर्फे या दोन्ही गुणवंत खेळाडूंचा जाहीर सत्कार करण्यात आला व राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.