
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः हरमीतसिंग रागी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात डीबीए संघाने एमजीएम संघाचा सहा विकेट राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात हरमीतसिंग रागी याने सामनावीर किताब मिळवला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. डीबीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमजीएम संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १३९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना डीबीए संघाने १९.३ षटकात चार बाद १४० धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला व उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात डॉ मयूर राजपूत याने दोन उत्तुंग षटकार व दोन चौकारांसह २१ चेंडूत ३३ धावांची आक्रमक खेळी साकारली. अक्षय बनकर याने ३३ धावांची वेगवान खेळी करताना दोन चौकार मारले. सत्यजीत वकील याने २४ चेंडूत ३२ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत हरमितसिंग रागी याने २० धावांत दोन विकेट घेतल्या. अजय शितोळे याने २४ धावांत दोन आणि रहीम खान याने २६ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः एमजीएम संघ ः २० षटकात सात बाद १३९ (गिरीश गाडेकर १८, अमर असोलकर १३, अक्षय बनकर ३३, सुमित लोंढे १०, डॉ मयूर राजपूत ३३, सागर शेवाळे ७, डॉ आर्यन केंद्रे नाबाद ४, इतर २०, अजय शितोळे २-२४, हरमितसिंग रागी २-२०, दिनकर काळे २-२९, मोहित घाणेकरक १-२१) पराभूत विरुद्ध डीबीए संघ ः १९.३ षटकात चार बाद १४० (मुकुल जाजू २८, सूरज एम २५, गौरव शिंदे नाबाद ३०, सत्यजीत वकील ३२, हरमितसिंग रागी नाबाद ११, इतर १३, रहीम खान २-२६, अक्षय बनकर १-१०). सामनावीर ः हरमीतसिंग रागी.