
व्यंकटेश सोनवलकर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱया क्वार्टर फायनल सामन्यात एनआरबी संघाने मेटलमन संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात व्यंकटेश सोनवलकर याने सामनावीर किताब संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. मेटलमन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली व २० षटकात आठ बाद ८९ असे माफक लक्ष्य उभे केले. एनआरबी संघाने अवघ्या ९.४ षटकात दोन बाद ९१ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकून सहजपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात विनोद लंबे याने ३८ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार मारले. अनिकेत काळे याने चार चौकारांसह ३६ धावांची आक्रमक खेळी केली. शुभम हरकळ याने १३ चेंडूत २३ धावा फटकावल्या. त्याने दोन उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले. गोलंदाजीत व्यंकटेश सोनवलकर याने १० धावांत तीन विकेट घेत आपला ठसा उमटवला. सचिन शेडगे याने १३ धावांत दोन गडी बाद केले. राहुल दांडगे याने १९ धावांत एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक ः मेटलमन संघ ः २० षटकात आठ बाद ८९ (अनिल यादव ११, अनिकेत काळे ३६, अविनाश वानखेडे नाबाद १७, इतर १९, व्यंकटेश सोनवलकर ३-१०, सचिन शेडगे २-१३, राहुल दांडगे १-१९, स्वप्नील मोरे १-२६) पराभूत विरुद्ध एनआरबी संघ ः ९.४ षटकात दोन बाद ९१ (सचिन शेडगे ६, विनोद लंबे नाबाद ३८, शशिकांत पवार १५, शुभम हरकळ नाबाद २३, आर एस गायकवाड १-२४). सामनावीर ः व्यंकटेश सोनवलकर.