
नागपूर (सतीश भालेराव) ः पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय सीएसएसआर डेमो स्पर्धेत पश्चिम झोन स्पर्धेत महाराष्ट्र एसडीआरएफ संघाने उपविजेतेपद मिळवले.
पुणे शहरात महान निर्देशनालय राष्ट्रीय आपदामोचक बल नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सीएसएसआर स्पर्धेचे आयोजन एनडीआरएफ ५ बटालियन सुदुंबरे, पुणे महाराष्ट्र येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, दमन दिव, मध्य प्रदेश, गोवा या सर्व राज्यांच्या संघांनी शोध बचाव दक्षता बाबतचे प्रात्यक्षिक सादर केले होते. या स्पर्धेमध्ये एसडीआरएफ दमन दिव संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. समादेशक आणि नियंत्रण अधिकारी डॉ प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याच्या संघाने स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.
प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करणाारे दोन्ही संघ राष्ट्रीय स्तरावर सीएसएसआर स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता दिल्लीला जाणार आहेत. सदर प्रात्यक्षिक करिता राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक सुरेश मेकला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मोहसिन शाहेदी, संतोष बहादुर, एनडीआरएफ बटालियन सुदुंबरे पुणे हे उपस्थित होते.
राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे समादेशक आणि नियंत्रण अधिकारी डॉ प्रियंका नारनवरे यांचे या स्पर्धेच्या सरावकारिता महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले होते. सीएसएसआर डेमोमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक भंडारे व पोलीस उपनिरीक्षक गावंडे यांनी टीमचे नेतृत्व केले.
Yash
Thank you very much